घेऊ दिवाळीचा आनंद, आयुर्वेदासह…

घेऊ दिवाळीचा आनंद, आयुर्वेदासह…

अंधारावर उजेडाच्या, दुराचारावर सदाचाराच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा सण म्हणजे दिवाळी. स्वादिष्ट खाद्यपदार्थ (फराळ, मिठाई) खाण्याचा, दिवे प्रज्वलित करण्याचा, नवीन वेशभूषा परिधान करण्याचा, कुटुंब – मित्रांसह उत्साहात साजरा करण्याचा सर्वात मोठा सण !
दिवाळी जस जशी जवळ येते…  तसतसे वेध लागतात ते पारंपरिक मिठाई, फराळ आणि स्वादिष्ट अन्नपदार्थ खाण्याचे. पोट फुटे पर्यंत एकमेकांना आग्रह करून खाऊ घालणे, लाडू आवडतात म्हणून २ जादाच खाणे. त्रास झाला तरी चालेल पण खाण्याचा आनंद मनसोक्त घेणे. ह्यात दुर्लक्ष होते ते शरीराकडे, आरोग्याकडे.
आनंदाने २ – २ पदार्थ जादाच खातो पण, नंतर प्रारंभ होतो, अस्वस्थ वाटतंय पासून ते ॲसिडिटी झाली, पर्यंतच्या त्रासाचा. ह्या उत्साहाच्या वातावरणाला गालगोट तो ॲसिडिटीने. ह्यावर उपाय म्हणजे ॲसिडिटी होणारे पदार्थ न खाणे. मात्र ते काही शक्य होत नाही. आपले नियंत्रण ना मनावर ना जिभेवर…
 
त्रास होऊ नये यासाठी –
प्रमाणात खाणे
मीठ – मसाल्यांचा प्रमाणात वापर
शिळे न खाणे
गोड विशेषतः साखरेचे व दुधाचे पदार्थ न खाणे
शारीरिक – मानसिक तणावा पासून दूर राहणे
योगा – प्राणायामाचा नियमित अभ्यास
परंतु ॲसिडिटी, गॅसेस, अपचन, बद्धकोष्टता यांसारखे त्रास सुरु झाला कि दिवाळी सारख्या उत्साहाच्या सणाचा देखील आनंद घेता येत नाही. ह्या साठी उपाय म्हणून काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे दिवाळी चा आनंद मनसोक्त घेता येईल.
आवळा
आवळा (आमला) “व्हिटॅमिन सी” चा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत आहे. आवळा हे एक आयुर्वेदिक रसायन आहे, ज्यास प्रतिकारशक्ती वाढणारा आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असलेला म्हणून ओळखले जाते. पचनास अनुकूल, अन्नाच्या विघटनासाठी जठराच्या क्रिया वाढवणारे, पोटातील गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्या कमी होण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.आवळ्यामध्ये सौम्य रेचक गुणधर्म आहेत आणि ते आतड्यांचे नियमन करतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.
घरगुती उपाय –
 1. आवळ्याचे 3 ते 4 ग्रॅम चूर्ण सकाळी कोमट पाण्यासोबत घ्या, ते रसायन (प्रतिकारशक्ती वाढवणारे) म्हणुन काम करते आणि आतड्यांचे आरोग्य देखील सुधारते.
 2. आवळ्याचे चूर्ण आणि एक चमचा तूप मिसळून खाल्याने अपचन आणि ॲसिडिटी कमी होते.
 3. अ‍ॅसिडिटीसाठी जेवणानंतर लगेच एक चमचा आवळा चूर्ण मधासोबत खा.
 4. आवळा चूर्ण 1 टीस्पून रात्री कोमट पाण्यासोबत घेतल्याने बद्धकोष्ठता (पोट साफ न होणे) दूर होते.
बडीशेप
बडीशेप दाह कमी करणारी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. ज्यामुळे शरीरातील ॲसिडिटी, अपचन, गॅसेस आणि बद्धकोष्ठता कमी होते. जर सतत ॲसिडिटीचा त्रास होत असेल, तर जेवणानंतर चावून खाल्यास अधिक फायदे मिळतात.
घरगुती उपाय –
 1. अपचन बरे करण्यासाठी बडीशेप आणि विलायची एकत्र करून 1/4 चमचा हे चूर्ण जेवणानंतर पाण्यासोबत घ्या.
 2. बडीशेप चघळल्याने पोट दुखी कमी होते आणि उलट्यांवर नियंत्रण येते.
 3. बडीशेप बारीक करून गरम पाणी घाला. एक मिनिटानंतर गाळून घ्या आणि जेवणानंतर प्या, यामुळे बद्धकोष्ठता दूर होते.
जिरे
जिरे हे स्वयंपाक घरात आढळणारे एक आवश्यक मसाला. ज्याचा वापर जेवणात तसेच औषध म्हणून देखील फायद्याचा ठरतो. जिऱ्यामध्ये आढळणारे पोषक तत्त्व आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्मामुळे पचनास मदत होते, तोंडाला चव येते. पोटदुखी, जळजळ यासारखे इतर पोटाच्या विकारांवर उपयुक्त आहे.
घरगुती उपाय –
 1. उलट्या आणि मळमळ यासाठी एक कप पाणी आणि जिरे, जायफळ एकत्र करून उकळवा आणि प्या.
 2. गॅस कमी होण्यासाठी, 2 कप पाण्यात एक चमचा जिरे टाका आणि पाण्याचे प्रमाण अर्धे होईपर्यंत उकळवा. हा काढा दररोज प्या.
 3. सूज दूर करण्यासाठी, एक ग्लास ताकात जिरे पावडर एकत्रित करून त्याचे सेवन करा.
 4. अपचनासाठी एक ग्लास पाणी उकळून त्यात जिरे, कोथिंबीर आणि मीठ टाका. जेवणानंतर हे मिश्रण प्या.
धने (कोथांबीर)
धने/कोथांबीर चा उपयोग हा साधारणतः जेवण सजवण्यासाठी, पदार्थांमध्ये सुगंध आणण्यासाठी केला जातो. तसेच यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
पचनाच्या समस्या आणि पित्त विकारांवर एक प्रभावी कार्य करते.  गॅस, पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि इतर पोटाचे आजारांमध्ये देखील उपयुक्त आहे. पचनशक्ती वाढवते आणि शरीरात अमा (विष) तयार होण्यास प्रतिबंध करते.
घरगुती उपाय –
 1. धणे भूक उत्तेजित करण्यास मदत करते आणि पचण्यास सहाय्यक आहे, यासाठी भातासोबत धने पेस्टचे सेवन केले फायद्याचे ठरते.
 2. पोटदुखीवर उपचार करण्यासाठी धना पावडर पाण्यात मिसळून उकळावी, त्यात थोडी साखर घालून जेवणापूर्वी सेवन करा.
 3. कोथिंबीर पचनास मदत करते आणि पोट निरोगी ठेवते. त्यामुळे रोजच्या जेवणात वापर करावा.
तुळशीची पाने
तुळशीला ‘हर्ब क्वीन’ असे संबोधले जाते. भारत देशामध्ये तुळशीला पूजनीय स्थान दिले आहे, एवढे महत्व तुळशीला आहे. बहूगुणी औषधी आहे, भरपूर प्रमाणात ऑक्सिजन चा पुरवठा करते. तसेच पोटाच्या विकारांसाठी तुळस एक वरदान आहे. जळजळ, पोटदुखी, गॅस, इ. तसेच पोटाचे अल्सर कमी होण्यासाठी गुणकारी कार्य करते. तोंडाची चव सुधारते.
घरगुती उपाय –
 1. जळजळ होत असताना 4-5 तुळशीची पाने चावून खावी.
 2. दोन कप पाण्यात 6 – 8 तुळशीची पाने टाका आणि मंद आचेवर 5 मिनिटे उकळा. पाणी अर्धे आटल्यावर गाळून घ्या आणि कोमट असतानाच प्या.
पुदीना
आहारात स्वादा व्यतिरिक्त पुदीन्याची अनेक वैशिष्ट्यही आहेत. पुदीन्याची पानं हे अन्नाचं पचन करण्यासाठी फायदेशीर आहे.पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीना हा सर्वोत्तम मानले जाते. पुदीन्याची पाने सर्वोत्तम शीतलक म्हणून काम करतात, त्यामुळे ते जळजळ आणि पोटदुखी कमी करते. तसेच ॲसिडिटी वर उपयुक्त आहे.
घरगुती उपाय –
 1. अपचन आणि जळजळीच्या समस्या दूर करण्यासाठी काळे जीऱ्यासोबत पुदीना तेल एकत्र करून जेवणानंतर प्या.
 2. पचनाक्रिया व्यवस्थित होण्यासाठी सुमारे ४ कप पाणी उकळा, त्यात पुदिन्याची पाने घाला आणि ५ मिनिटे उकळा. गाळून ते प्यावे.
ओवा
ओवा हा किचन मध्ये सहजासहजी असणारा मसाल्याचा पदार्थ. ज्यामध्ये पाचक गुणधर्म आहेत. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते.भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये ओवा आवर्जून वापरला जातो. ओव्यामुळे पदार्थ रुचकर तर होतातच तसेच अनेक आरोग्य समस्या घरीच कमी करता येतात.
 1. गॅसेसमुळे होणारी पोटदुखी बरी करण्यासाठी सुंठ आणि ओवा एकत्र बारीक करून घ्या. लिंबाचा रस आणि मीठ घाला आणि हे मिश्रण कोरडे करा. हे 1 ग्रॅम सकाळी आणि संध्याकाळी घ्या.
 2. एक कप कोमट पाण्यात ओवा रात्रभर ठेवा आणि लहान मुलांच्या पोटदुखीसाठी दिवसभर वापरा.
 3. जीआयटी डिटॉक्सिफिकेशनसाठी – ओवा, आल्याची पावडर सोबत दिवसातून एकदा सकाळी गूळ घेतल्याने फायदा होतो.

Leave a Reply