ऍसिडिटीमध्ये टाळण्याचे पदार्थ
आंबट पदार्थ= चिंच (भेळ/पाणीपुरी/ दहीपुरी/ रगडा/चिंच घालून केलेली आमटी/वरण), टोमॅटो, लिंबू, दही, योगर्ट, ताक, संत्री, मोसंबी, कैरी (लोणचे/मुरंबा/खारवलेली कैरी), कवठ, व्हिनेगर, आंबवून केलेले पदार्थ (इडली/डोसा/उत्तपा/), ब्रेड, सोया सॉस, सायट्रिक ऍसिड (जॅम/जेली/केचअप /चीझ / चायनीज फूड), मेयॉनीज, सॉफ्टड्रिंक्स
खारट पदार्थ= मीठ (वरून घेण्याची सवय आहे का?), चिप्स, वेफर्स, खरदाने, शेव, फरसाण, पापड, लोणचे, पास्ता सॉस, फ्रेंचफ़्राईस, बर्गर, खारावलेले मासे/ बोंबील/ सुकट
मैद्याचे पदार्थ- ब्रेड, बिस्कीट, केक, नान, उडल्स, पास्ता, नानकटाई,खारी,टोस्ट, पॅटिस , शंकरपाळी, रुमालीरोटी, सामोसा
अन्य पित्त वाढवणारे पदार्थ=
हिरवी/लाल मिरची, मिरचीचा खर्डा/ चटणी, आले, लसूण इ. चा जास्त वापर
मसाल्याच्या पदार्थांचा जास्त वापर (जिरे,मोहरी, मिरे, दालचिनी, तमालपत्र, इ.)
मसालेदार भाज्या/पदार्थ
पोहे
सिमला मिरची, मेथी, शेपू, करडई, मुळा, वांगी, पालक
अननस, किवी
हुलगा, उडीद,हरभरा, तूर
बाजरी
चहा, कॉफी, ब्लॅक टी
मोहरीचे तेल
मांसाहारी पदार्थ, मासे
मद्यपान/ तंबाखू/गुटखा/पान मसाला इ.चीसवय

